विशाल देवकर, प्रतिनिधी
नागपूर, 14 एप्रिल: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यांनी रक्ताचा एक थेंबही न सांडता मोठी धम्म क्रांती घडवून आणल्याचा उल्लेख नेहमी केला जातो. 14 एप्रिल हा दिवस धम्मचक्र परिवर्तन दिवस म्हणूनच ओळखला जातो. दरवर्षी या दिवशी लाखो अनुयायी दीक्षाभूमीवर येत असतात. परंतु, बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारण्यासाठी नागपूरचीनिवड का केली? यामागं नेमकं कारण काय आहे? हे तुम्हाला माहिती आहे का?
बाबासाहेबांची शपथ आणि बौद्ध धर्माचा स्वीकार
हिंदू धर्मात दलितांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर लढा दिला. त्यामुळेच त्यांनी 13 ऑक्टोबर 1935 मध्ये येवला येथे धर्मांतराची घोषणा केली. "मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही," असे उद्गार त्यांनी काढले होते. त्यानंतर विविध धर्मांचा अभ्यास करून त्यांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धम्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. 1956 पर्यंत धर्मांतर कधी व कुठे होणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती.
नागपूरचे नाव ठरलेच नव्हते
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. तेव्हा ठिकाणासाठी विविध नावं पुढे आली. विशेष म्हणजे यामध्ये सुरुवातील नागपूर नव्हतेच. तर वाराणसी येथील सारनथ हे ठिकाण सुरुवातीला चर्चेत होते. याच ठिकाणी गौतम बुद्धांनी पहिला उपदेश केला आणि भिक्षूसंघ स्थापन केला. त्यामुळे या हे ठिकाण अनेकांनी सुचविले होते. त्यानंतर अनेक पर्याय पुढे आले. शेवटी मंबई हे ठिकाण निश्चित होत आले होते.
वामनराव गोडबोले यांचा पुढाकार
बौद्ध धर्माची दीक्षा घेण्यासाठी मुंबई या ठिकाणाला सर्वाधिक पसंती होती. परंतु, धम्मसेनानी वामनराव गोडबोले यांनी नागपूरचे नाव सुचविले तसेच त्यामागचा उद्देशही स्पष्ट केला. गोडबोले यांच्या आग्रहामुळे पुढे नागपूर हे ठिकाण निश्चित झाले. विशेष म्हणजे धम्मचक्र परिवर्तनाच्या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी गोडबोले यांनी स्वीकारली. तसेच नागपुरातील तत्कालीन बौध्दजण समितीने या सोहळ्याचा संपूर्ण खर्च आणि जवाबदारी घेतली. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर हेच ठिकाण बौद्ध धर्माची दीक्षा घेण्यासाठी सुनिश्चित केले.
अवकाशातील ताऱ्याला मिळालं बाबासाहेबांंचं नाव, 132 व्या जयंतीदिनी 'या' पद्धतीनं घ्या दर्शन
नागपूर नागवंशीयांची राजधानी
धर्मपरिवर्तनासाठी नागपूरची निवड करण्यास काही प्रमुख कारणे होती. यामध्ये पूर्वी नागपूर ही नागवंशीयांची राजधानी होती. नागवंशीय लोक हे पूर्वाश्रमीचे बौद्ध मानले जातात. त्यामुळे नागपुरात धम्मदीक्षा समारंभ झाल्यास मोठ्या संख्येने लोक सहभागी होतील, असे गोडबोले यांचे मत होते. तसेच नागपूर हे देशाच्या केंद्रस्थानी असल्याने दळणवळणाच्या दृष्टीनेही सोयीचे ठिकाण होते.
लाखो अनुयायांसह बाबासाहेब बौद्ध धर्मात
पूर्वनियोजनानुसार 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपुरातील अंबाझरी रोडवर दीक्षाभूमी येथे भव्य मंडप घालण्यात आला. सकाळी 9.30 च्या सुमारास बाबासाहेब व माईसाहेब आंबेडकर यांचा बौद्ध धम्म दीक्षा विधी पूज्य भन्ते चंद्रमणी महास्थवीर यांनी केला. पुनः त्याच मंडपात खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुमारे 5 लाखापेक्षा अधिक बांधवाना 22 धम्म प्रतिज्ञा देऊन स्वतः बौद्ध धम्माची दीक्षा दिली, अशी माहिती बुद्धिस्ट कौन्सिल ट्रस्टचे चंद्रशेखर गोडबोले यांनी दिली.